|

Evadhe Tari Karun Ja / एवढे तरी करून जा

Evadhe Tari Karun Ja / एवढे तरी करून जा एवढे तरी करून जा हा वसंत आवरून जा ही न रीत मोहरायची आसवांत मोहरून जा तारकांपल्याड जायचे ह्या नभास विस्मरून जा ये उचंबळून अंतरी सावकाश ओसरून जा ह्या हवेत चंद्रगारवा तू पहाट पांघरून जा ये सख्या उदास मी उभी आसमंत मंतरून जा English Ewadhe tari karun…

|

Ektari Sange Ekroop Zhalo / एकतारी संगे एकरूप झालो

Ektari Sange Ekroop Zhalo / एकतारी संगे एकरूप झालो एकतारी संगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो गळा माळ शोभे आत्मरूप शांती भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास घ्यावी ऊब गोधडीची माया मोह सारे उगाळून प्यालो पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला कुणी राव होई कुणी रंक…

|

Ektari Gate Gate Geet Vitthalache / एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे

Ektari Gate Gate Geet Vitthalache / एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे एकतारी गाते, गाते गीत विठ्ठलाचे वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे अनाथांचे नाथ, नाथ माझे दीनानाथ भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे English Ekataari gaate, gaate…

|

Ekda Yeun Ja Tu Ekda Bhetun Ja / एकदा येऊन जा तू, एकदा भेटून जा

Ekda Yeun Ja Tu Ekda Bhetun Ja / एकदा येऊन जा तू, एकदा भेटून जा एकदा येऊन जा तू, एकदा भेटून जा मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगून जा मीलनाचे चित्र होते अंतरी मी रेखिले मी तुझ्यामाझ्यात होते विश्व सारे देखिले आज सीमा त्या जगाची तूच ओलांडून जा शेवटी संपून गेली स्वप्नसुंदर ती कथा…

|

Ekda Haas Tu / एकदा हास तू

Ekda Haas Tu / एकदा हास तू एकदा हास तू, एकदा हास तू हसत माझा मला परत दे श्वास तू ऐक आता तरी पूस ही आसवे बोल माझ्यासवे बैस माझ्यासवे विसर हे कालचे करूण आभास तू वेदनेला कुणी हाक मारू नये भेटलेल्या सुखा दूर सारू नये का तुझा जाळशी व्यर्थ मधुमास तू एकटे मी तुला…

|

Ekati Ekati Ghabarlis / एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई

Ekati Ekati Ghabarlis / एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही आली होती जाम झोप गुडूप झालो असतो भीती बीती कसली थेट उद्याच उठलो असतो मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही मी आहे शूर माझी आई तशी नाही खिडकी वाजली नुसती…

|

Ekach Hya Janmi Janu / एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी

Ekach Hya Janmi Janu / एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील सार्‍या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी आशा उद्याच्या…

|

Eka Talyat Hoti Badake / एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख

Eka Talyat Hoti Badake / एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी भावंड ना विचारी,…

|

Eka Makdane Kadlay Dukan / एका माकडाने काढलंय दुकान

Eka Makdane Kadlay Dukan / एका माकडाने काढलंय दुकान एका माकडाने काढलंय दुकान आली गिऱ्हाईके छान छान मनीने आणले पैसे नवे म्हणाली शेटजी उंदीर हवे अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा माकड म्हणाले लावून गंध आता झालंय दुकान बंद English Eka maakadaane kaadhalny dukaan Ali…

|

Ek Vaar Pankhavaruni / एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात

Ek Vaar Pankhavaruni / एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात वने, माळराने, राई, ठायी ठायी केले स्नेही तुझ्यविना नव्हते कोणी आत अंतरात फुलारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे राणी तुझ्या मनगटी ही बसले कुणी भाग्यवंत मुका…